'आरआरआर'चा धमाकेदार ट्रेलर

    दिनांक : 09-Dec-2021
Total Views |
मुंबई : बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' (RRR) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 7 जानेवारी 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.आरआरआर या पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपटाची निर्मिती DVV एंटरटेनमेंट्सच्या डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे. बाहुबली नंतर एसएस राजामौली यांच्या या आरआरआर हा मल्टि स्टारर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

drama_1  H x W: 
 
चित्रपटाचे कथानक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू या तरुणांच्या जीवनात येणारे प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. अल्लुरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण तर कोमाराम यांच्या भूमिकेत ज्यूनियर एनटीआर दिसणार आहेत. तसेच सीता या भूमिकेत आलिया भट दिसणार आहे. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.