Wednesday, 13 August, 2025

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

भूमी-कियारा एकत्र दिसणार

    दिनांक : 09-Dec-2021
Total Views |
मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्‍शनने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे 'गोविंदा नाम मेरा' असे नाव आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील विकी, भूमी आणि कियारा आडवाणीचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. या चित्रपटात विकी कौशल हा गोविंदा वाघमारेच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
kiraya_1  H x W 
 
तसेच भूमी पेडणेकर ही गोविंदाची हॉट वाईफ आणि कियारा आडवाणी ही गोविंदाची नॉटी गर्लफ्रेंड म्हणून काम करणार आहे. करण जोहरने विकी कौशलच्या भूमिकेचे पोस्टर शेअर करत लिहिले की, 'या गोविंदा वाघमारेशी भेटा. ज्याचे मन हे गोल्ड आणि डांस मुव्ह हे बोल्ड आहेत. सादर करत आहे, 'गोविंदा नाम मेरा'. तिथे तुम्हाला खळखळून हसण्याची आणि गोंधळात पडण्याची शक्‍यता आहे. 10 जून 2022 मध्ये चित्रपटगृहात होणार प्रदिर्शत.' याशिवाय करण जोहरने भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणीचा फर्स्ट लूकदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. शशांक खेतान द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट 10 जून 2022 मध्ये प्रदिर्शत करण्यात येणार आहे.
अन्य बातम्या