मुलीचा लग्नात भावुक झाले जेठालाल

    दिनांक : 15-Dec-2021
Total Views |
मुंबई : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल ही भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्या मुलीचा म्हणजेच नियती जोशीचा 11 डिसेंबर रोजी लग्न सोहळा पार पडला. नुकतेच सोशल मीडियावर दिलीप जोशी यांनी नियतीच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. दिलीप जोशी यांनी मुलीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'नियतीला आणि आमच्या कुटुंबातील नवा सदस्य यशोवर्धनला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा. आमच्यासोबत राहुन आमच्या मुलांना आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय स्वामीनारायण '
jetha_1  H x W: 
 
पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबतचे फोटो दिलीप सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. मालिकेमधील द्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसोबतच्या दिलीप यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी सांगितले होते की, 'मला रोज अनेक लोक विचारत होते की दिशा माझी पत्नी आहे का? मी त्यांना सांगतो की जयमाला ही माझी पत्नी आहे.' 28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.