सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात

    दिनांक : 20-Sep-2021
Total Views |
मुंबई :  'कलर्स मराठी' वाहिनीवर आजपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मध्ये तृप्ती देसाई या डॅशिंग सामाजिक कार्यकर्त्या सहभागी झाल्या आहेत. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक प्रमुख असलेल्या तृप्ती देसाईंची महिलांना न्याय, हक्क आणि समान संधी मिळावी यासाठी आंदोलन करण्याकरिता ख्याती आहे. त्यांनी २०१६ मध्ये शनि शिंगणापूर मंदिरात शनि देवाची पूजा करण्याचा अधिकार महिलांनाही मिळावा यासाठी आंदोलन केले होते. याआधी २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. नंतर २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेड स्थापन केली. सामाजिक क्षेत्रातील आणि महिलांच्या हितांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन तृप्ती देसाई यांना २०१६च्या सलामी पुणे पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता बिग बॉसच्या घरात त्यांचा प्रवेश झाला आहे.
 
trupti_1  H x W 
 
पहिल्या आठवड्यात तृप्ती देसाई आणि उत्कर्ष शिंदे यांच्याकडे भांडी घासण्याची जबाबदारी आहे. तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करत असताना सर्व स्पर्धकांना मोडेन पण वाकणार नाही असा इशारा दिला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात कशा राहणार आणि पुढे काय होणार हे कार्यक्रमाच्या पुढील भागांतून कळेल.