कर्णाच्या भूमिकेत दिसणार रणबीर?

    दिनांक : 03-Oct-2021
Total Views |
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आलिया भटसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने तिच्यासोबत जोधपूर येथे वाढदिवस साजरा केला. आता तो एका नवीन कारणांनी चर्चेत आला आहे.याचं कारण एक आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी करत आहे. या आधी पूजा एन्टरटेन्मेंट या नावाखाली त्याने कूली नं 1 आणि बेल बॉटम अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता जॅकी एका मोठ्या बजेटच्या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
karna_1  H x W: 
 
या चित्रपटाचं नाव सूर्यपुत्र महावीर कर्ण असं असेल. या चित्रपटात आधी दाक्षिणात्य अभिनेता विक्रम दिसणार होता. मात्र, काही कारणांमुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला.आता या भूमिकेसाठी रणबीर कपूरचा विचार सुरू आहे. जॅकी भगनानीच्या रणबीरसोबत भेटी वाढत असून त्यामुळे या चित्रपटासाठी त्याचा विचार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या रणबीर शमशेरा, ब्रह्मास्त्र आणि एनिमल या चित्रपटात झळकताना दिसणार आहे. यातील शमशेरा आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झालं असून एनिमलचं चित्रीकरण सुरू होणार आहे.