जान्हवीच्या 'मिली'चे शूटिंग पूर्ण

    दिनांक : 01-Dec-2021
Total Views |
मुंबई : जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून 'मिली' या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र, जान्हवीने आता या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर वडील बोनी कपूर यांच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. 'मिली'चे प्रॉडक्‍शन स्वतः बोनी कपूरच करत आहे. त्यामुळे वडिलांच्या बरोबर काम करण्याचा जान्हवीला पहिला अनुभव मिळाला आहे. हा अनुभव देखील जान्हवी कपूरने आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे.
 
mili_1  H x W:  
 
निर्माता म्हणून बोनी कपूर आपल्या सेटवरील कर्मचाऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगत आहे आणि त्यावेळी जान्हवी आपल्या वडिलांकडे खूप कौतुकाने बघत आहे. असा हा फोटो आहे. आतापर्यंत वडिलांकडून केवळ निर्माते म्हणून सिनेमांच्या कथा ऐकायला मिळाल्या होत्या. आता प्रथमच त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. पूर्णपणे सिनेमावर फोकस आणि सिनेमाप्रती पूर्ण प्रेम असणाऱ्या व्यक्तीबरोबर कामाचा हा अनुभव होता. तुम्ही किती कष्ट घेता म्हणूनच सिनेमा उत्तम आणि हिट होतो, हे जवळून बघायला मिळाले, असे तिने म्हटले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये जान्हवीच्या समोर फ्लॅपबोर्ड धरला आहे आणि त्यावर 'मिली' लिहिलेले आहे.