पंतप्रधानांच्या सुरक्षेतील मोठ्या चूके बाबत सर्वोच्च न्यायालयाने ठरविले एसएसपीला दोषी

    दिनांक : 25-Aug-2022
Total Views |
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM's security यांच्या या वर्षी जानेवारी महिन्यात पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टीका केली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश म्हणाले की, फिरोजपूरचे एसएसपी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत.
 
 
suraksha
 
 
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, PM's security त्यांना पंतप्रधानांच्या प्रवासाच्या मार्गाची माहिती दोन तास अगोदर देण्यात आली असली तरी पुरेसा फौजफाटा उपलब्ध असूनही ते कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले. CJI म्हणाले की, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधानांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
 
वकिलाने या अहवालाची PM's security प्रत सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली असता न्यायालयाने ती देण्यास नकार दिला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सरन्यायाधीशांनी इंदू मल्होत्रा ​​यांचा अहवाल वाचताना सांगितले की, फिरोजपूरच्या एसएसपीला दोन तास आधी सांगण्यात आले होते की पंतप्रधान त्या मार्गाने प्रवेश करतील, त्यानंतरही ते सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले. या समितीने पंतप्रधानांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक सूचनाही दिल्या आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील PM's security भटिंडा विमानतळावरून हुसैनीवाला हुतात्मा स्मारक येथे रॅलीला संबोधित करणार होते. पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकला होता. यामुळे त्याला परत यावे लागले. ताफ्याला रोखण्याची जबाबदारी एका शेतकरी संघटनेने घेतली होती. वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा यांच्या खंडपीठासमोर पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला होता.