केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न !

    दिनांक : 12-Jul-2022
Total Views |

 

कन्नूर :  केरळमधील कन्नूर येथील RSS office राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरएसएस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
 
 

rss 1 

 

 
 
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 1.30 वाजता कन्नूरच्या पायनूर येथील आरएसएस कार्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
 

या वर्षी फेब्रुवारीमध्ये केरळच्या एका पोलीस अधिकाऱ्याला RSS office आरएसएस कार्यकर्त्यांची माहिती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ला दिल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तो पीएफआयची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला (SDPI) माहिती लीक करत होता. आरोपी अनस पीके करिमन्नूर पोलीस ठाण्यात तैनात होता. इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, अनस पीके यांनी पोलिस डेटाबेसमध्ये उपस्थित सुमारे 200 आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांची वैयक्तिक माहिती सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला दिली होती. यापूर्वी 15 नोव्हेंबर 2021 रोजी केरळमधील पलक्कड येथे एका आरएसएस कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. संजीत (27 ) असे मृताचे नाव आहे. मृताच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा आढळून आल्या आहेत. भाजपने एसडीपीआयवर हत्येचा आरोप केला होता. आरएसएस कार्यकर्ता पत्नीसोबत प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.