जम्मूमध्ये भीषण अपघात...अमरनाथ यात्रेचे 20 भाविक जखमी, तर दोघांची प्रकृती चिंताजनक

    दिनांक : 14-Jul-2022
Total Views |
 
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये बदरागुंड परिसरात गुरुवारी एक मोठा रस्ता अपघात झाला, असून ज्यामध्ये अमरनाथ यात्रेला जाणारे 20 यात्रेकरू जखमी झाले. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, सध्या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन 16 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले. जखमींना अनंतनाग येथील जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रशासित प्रदेशातील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंडजवळ झालेल्या एका भीषण अपघातात अमरनाथ यात्रेला निघालेले 20 यात्रेकरू जखमी झाले आहेत. बदरागुंड परिसरात हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस गुरुवारी सकाळी डंपरला धडकली. या अपघातात 20 यात्रेकरू जखमी झाले असून, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर 18 प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 

apghat
 
 
दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात पावसानंतर खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा Amarnath Yatra गुरुवारी दोन्ही मार्गांवर थांबवण्यात आली. याविषयी माहिती देताना पवित्र यात्रेशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रा सकाळी पहलगाम आणि बालटाल मार्गांवरून तात्पुरती थांबवण्यात आली असून कोणत्याही यात्रेकरूंना पवित्र गुहा मंदिराकडे जाण्याची परवानगी नाही. हवामान सुधारल्यावरच अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले, त्याआधी, अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीमुळे गेल्या आठवड्यात 8 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामुळे रविवारी यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी पुन्हा सुरू झाले. ढगफुटीच्या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात बेपत्ता झाले होते.