काँग्रेसचा युट्यूब चॅनेल डिलीट झाल्याने मोठी खळबळ !

    दिनांक : 24-Aug-2022
Total Views |
नवी दिल्ली: मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी देशविरोधी अफवा पसरविणारे युट्यूब चॅनेल बंद केले होते. आज काँग्रेसचा युट्यूब चॅनेल डिलीट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
yutube
 
 
महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने बॅन केलेल्या चॅनेलमध्ये काँग्रेसच्या या चॅनेलचे नाव नव्हते.काँग्रेस पक्षाचे युट्युब चॅनल डिलीट झाले आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
 
काँग्रेस पक्षाचे युट्युब चॅनल डिलीट झाले आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. हे चॅनल का डिलीट झाले, याबाबत तपास सुरू आहे. काँग्रेसने यूट्यूब आणि गुगल या दोघांशी संपर्क साधला आहे आणि त्यांचे चॅनल रिस्टोर करण्यास सांगितले आहे.
 
पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे यूट्यूब चॅनल 'इंडियन नॅशनल काँग्रेस' (Indian National Congress) डिलीट झालेआहे. आम्ही हे ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची YouTube आणि Google टीमशी चर्चा सुरू आहे. तपास सुरू असून, तांत्रिक बिघाड होता की, काही कट होता, हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच हे चॅनल रिस्टोर होईल, अशी आशा आहे.
 
याआधीही देशातील अनेक बड्या नेत्यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र कोणत्याही पक्षाचं संपूर्ण यूट्यूब चॅनल डिलीट झाल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. सध्या याचे कारण स्पष्ट नसल्यामुळे, अशा परिस्थितीत काँग्रेसही आपल्या अधिकृत निवेदनात केवळ तपासाबाबतच बोलत आहे. पक्षाकडून हॅकिंगचा संशय वर्तवला जात आहे.
 
काँग्रेसचा युट्यूब चॅनल डिलीट झाल्याची माहिती काँग्रेसनेच ट्विटरवर दिली आहे. आमचा YouTube चॅनेल - 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' हटवण्यात आला आहे. यावर आम्ही काम करत आहोत. तसेच Google/YouTube टीमच्या संपर्कात आहोत. यामागे काही तांत्रिक बिघाड की अन्य काही घातपात आहे याचीही चौकशी केली जात आहे, लवकरच पुन्हा लाईव्ह येण्याची अपेक्षा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
 
चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केंद्र सरकारने यूट्यूब चॅनल्सवर कडक कारवाई केली आहे. कथितपणे अपप्रचार करणाऱ्या 8 यूट्यूब चॅनेलवर केंद्राने बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या 8 चॅनेल्सपैकी 7 भारतीय आणि 1 चॅनल पाकिस्तानी आहे. केंद्राने या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत अपप्रचार करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. आयटी नियम-2021 अंतर्गत हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
 
आतापर्यंत 102 चॅनेल्सवर
 
जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, डिसेंबर 2021 पासून आतापर्यंत 102 यूट्यूब आधारित न्यूज-चॅनेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आयटी मंत्री अनुराग ठाकूर यांनी जुलैमध्ये लोकसभेत सांगितले की 2021-22 मध्ये 78 YouTube-आधारित न्यूज-चॅनेलवर बंदी घालण्यात आली होती. तसेच, 560 YouTube लिंक ब्लॉक करण्यात आल्या होत्या.