केंद्र सरकारचा मोठा निर्णय... 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत

    दिनांक : 13-Jul-2022
Total Views |
दिल्ली: भारत सध्या 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. याला देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली.
 
 

boster 
 
कधी घ्यावा बूस्टर डोस? 
 
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.
 
लसीकरणाने  केला एकूण 199.12 कोटींचा टप्पा पार 
 
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.12 (1,99,12,79,010) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,61,58,303 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.76 (3,76,28,293) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.