मौलाना मुफ्ती असगरला बिहारमधून अटक

    दिनांक : 21-Jul-2022
Total Views |
 
 
जिहादमध्ये सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांचे करायचा ऑनलाइन ब्रेनवॉश 
 
पाटणा : पाटणा टेरर मॉड्युलमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी नुकतेच Maulana Mufti Asghar मौलाना मुफ्ती असगर अली याला ढाका, मोतिहारी येथून अटक करण्यात आले आहे. ज्याचे संबंध बांगलादेशच्या जेएमबी या दहशतवादी संघटनेशी जोडलेले असल्याचे आढळून आले आहे. एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुफ्ती हे मुस्लिम तरुणांचे ऑनलाइन ब्रेनवॉश करायचे आणि त्यांना जिहादमध्ये सामील होण्यासाठी प्रशिक्षण देत होते. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एका सुशिक्षित मुफ्तीचे बांगलादेशातील एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मुफ्ती यांचे दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानंतर एनआयए सक्रिय झाली आहे.
 
 
 
 
maulana
 
 
 
मौलाना मुफ्ती असगर Maulana Mufti Asghar हा बांगलादेश जेएमबीच्या जमात-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. मंगळवारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाने ढाका, मोतिहारी येथे छापा टाकला. तेथून मौलानाला आपल्या ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान मौलानाकडून एक लॅपटॉप आणि दोन बॅग जप्त करण्यात आल्या असून, जप्त केल्यानंतर तपास पथकानेही शोध घेतला आहे. बांगलादेशच्या या दहशतवादी संघटनेवर भारतात बंदी आहे. अटक करण्यात आलेला मौलाना मुफ्ती असगर अली हा मूळचा मोतिहारी येथील रामगढवा येथील आहे. एनआयएच्या तपासात मौलाना मुस्लिम तरुणांना आपल्या गटाशी जोडून त्यांना जिहादी बनवत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मुफ्ती ऑनलाइन ब्रेनवॉशची प्रक्रिया अवलंबत होते. मौलानाच्या लॅपटॉपमध्ये देशविरोधी व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. मौलानाच्या कारनाम्याची माहिती सर्वप्रथम एनआयएच्या उत्तर प्रदेश युनिटला मिळाली होती. त्यानंतर बिहार युनिटला माहिती शेअर करण्यात आली. त्यानंतर टीम तयार करून ढाका येथे छापे टाकण्यात आले. छापेमारीत मौलानाच्या अड्ड्यावरून अनेक प्रकारचे आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक साहित्य जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पथकाने मदरशातून काही सीडीही जप्त केल्या आहेत. त्यात कोणत्या प्रकारचा व्हिडिओ किंवा ऑडिओ आहे, याचा सध्या तपास सुरू आहे.