'लंच ब्रेक'च्या नावाखाली बँका ग्राहकांना ताटकळत ठेवू शकत नाहीत; रिझर्व्ह बँकेकडून माहिती

    दिनांक : 24-Jul-2022
Total Views |
'
 
नवी दिल्ली : कुठलीही बँक अगर त्या बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली ग्राहकांना ताटकळत ठेवू शकत नाहीत. माहितीच्या अधिकारात मागितल्यावरून स्वत: रिझर्व्ह बँकेने ही माहिती सार्वजनिक केली आहे.
 
 
 

reserv bank  
 
 
 
बँकेतील कर्मचारी एकाचवेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत. एकेकाने सोयीनुसार अशी सुट्टी घ्यावयाची असते. बँकेच्या कामकाजाच्या एकूण संपूर्ण वेळात सामान्य व्यवहार हा सुरूच राहिला पाहिजे. ग्राहकांना 'लंच ब्रेक'च्या नावाखाली दीड ते दोन तास ताटकळत ठेवणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. एखादा बँक कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली तुमचे काम ताटकळून ठेवत असेल, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध बँकेतील तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवू शकता. त्याची दखल घेतली जात नसेल; तर व्यवस्थापक, नोडल अधिकार्‍यांकडेही तक्रार करता येते. शिवाय, प्रत्येक बँकेत 'ग्रिव्हान्सेस रिड्रेसल फोरम' (तक्रार निवारण मंच) असतात. या मंचाचा फोन नंबर, ई-मेल आयडी तुम्ही बँकेकडून मिळवू शकता. बँकेच्या 'कस्टमर केअर'ला कॉल करून हा नंबर मिळवता येऊ शकतो. बँकेने महिनाभरापर्यंत तक्रारीची दखल न घेतल्यास बँकिंग लोकपालांकडे अपिलात जाता येते.
कर्जाचा अर्ज नाकारल्यास बँकेला कारण द्यावेच लागेल
 
तुमच्या कर्जाचा अर्ज कारण नमूद केल्याशिवाय बँक रद्द करू शकत नाही. तसे बँकेने केल्यास तुम्ही तक्रार करू शकता.
हेही जाणून घ्या…
 
- बँकेकडून 'चेक कलेक्शन'मध्ये विलंब झाल्यास बँकेला ग्राहकास भरपाई द्यावी लागेल.
 
- तुमच्याकडून दिल्या गेलेल्या 'इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस इन्स्ट्रक्शन्स'मध्ये बँकेकडून विलंब झाल्यासही ग्राहक म्हणून तुम्हाला भरपाई मिळेल.
 
खात्यात बॅलेन्स नसल्याने ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस) फेल झाल्यास ग्राहक म्हणून तुम्हाला दंड भरावा लागेल.
 
तुम्ही देशातील कुठल्याही बँकेत फाटक्या, जुन्या नोटा बदलू शकता. कुठलीही बँक तुम्हाला त्यासाठी नकार देऊ शकत नाही.