अग्निवीर भरती प्रक्रिया, सावधान .. दलालांचा सुळसुळाट

    दिनांक : 21-Sep-2022
Total Views |
ग्वाल्हेर मुख्यालयातून सागर जिल्हा प्रशासनामार्फत उमेदवारांसाठी माहिती जाहीर
 
सागर : भारतीय सैन्यात भरतीसाठी येत्या ऑक्टोबरमध्ये सागर येथे अग्निवीर agniveer भरती रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी सेनच्या ग्वाल्हेर मुख्यालयातून सागर जिल्हा प्रशासनामार्फत उमेदवारांसाठी माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, दलालांनी तात्पुरत्या वैद्यकीय नाकारलेल्या उमेदवारांशी संपर्क साधून त्यांची निवड करून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक असून आधार आणि राज्य शिक्षण मंडळाच्या डाटाबँकशी जोडलेली आहे, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही प्रकारे दलाल किंवा एजंटच्या भानगडीत पडू नये, कोणालाही पैसे देऊ नयेत, असे लष्कराने म्हटले आहे.
 
 

agnipath
 
 
 
आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस, ग्वाल्हे कडून अग्निवीर उमेदवारांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांनी त्यांच्या संगणकीकृत प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखांना रॅलीसाठी यावे, agniveer असे त्यात नमूद केले आहे. प्रवेशपत्राची चांगली प्रिंट कॉपी सोबत ठेवा. बारकोड लाइनवरून प्रवेशपत्र फोल्ड करू नका. पाऊस आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी ते प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ठेवा यासारख्या अनेक बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच कोणतीही औषधे, एनर्जी ड्रिंक्स किंवा ड्रग्स जवळ बाळगू नका. कायदा आणि सुव्यवस्था मोडू नका. पोलिस ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर पाळत ठेवण्यात येणार असून दोषींवर एफआयआर दाखल केला जाईल. ज्यामुळे त्यांना भविष्यात कोणत्याही सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागेल. ठेवता येईल असेही त्यात सांगण्यात आले आहे.