भारताने रचला इतिहास, राष्ट्रकुल 2022 मधील 200 सुवर्णपदके जिंकणारा भारत चौथ्या क्रमांकाचा देश

    दिनांक : 08-Aug-2022
Total Views |
नवी दिल्ली : 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (India win 200 gold) भारताची चांगली कामगिरी सुरूच आहे. भारताने या वर्षात आतापर्यंत एकूण 55 पदके जिंकली आहेत. या पदकांमध्ये सुवर्ण पदकांची संख्या 18, रौप्य पदक 15 आणि कांस्य पदकांची संख्या 22 आहे. बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रत्येक खेळात आपले वैभव दाखवले आहे.
 
 

india 
 
 
 
यावर्षी भारतासाठी सर्वाधिक पदके कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमधून आला आहे. भारताच्या कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये एकूण 12 पदके जिंकली आहेत, तर वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी एकूण 10 पदके जिंकली आहेत. या वर्षी एकूण 18 सुवर्णपदके जिंकून भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात आणखी एक विक्रम केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 200 सुवर्णपदके जिंकणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा यांनी ही कामगिरी केली आहे.
 
या वर्षी एकूण 18 सुवर्णपदके जिंकून (India win 200 gold) भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात आणखी एक विक्रम केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात 200 सुवर्णपदके जिंकणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने एकूण 981 सुवर्ण, इंग्लंडने 754 सुवर्ण आणि कॅनडाने एकूण 501 सुवर्णपदके जिंकली आहेत.
 
राष्ट्रकुल 2022 मधील भारताची उत्कृष्ट कामगिरी
 
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये (India win 200 gold) भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या पदकांची संख्या आता ५० च्या पुढे गेली आहे. आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंनी एकूण 55 पदके जिंकली आहेत. यामध्ये 18 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताला कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमधून सर्वाधिक पदके मिळाली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये 12 पदके जिंकली आहेत आणि वेटलिफ्टर्सनी 10 पदके जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्येही भारताला 7 पदके मिळाली आहेत.