देशातील जनतेची 5G मोबाईल सेवेची प्रतीक्षा लवकर येणार पूर्णत्वास ; देशभरात १ ऑक्टोबर पासून 5G सेवेचा शुभारंभ !

    दिनांक : 24-Sep-2022
Total Views |
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 1 ऑक्टोबर रोजी देशातील 5G सेवेचा (5G service) शुभारंभ करणार आहेत. अनेक दिवसांपासून देशातील जनतेला असलेली 5G मोबाईल सेवेची प्रतीक्षा आता पूर्णत्वास येणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 

5G2 
 
 
त्याचबरोबर 5G सेवेबाबत (5G service) अमेरिकेतील विमान वाहतुकीच्या मुद्द्यावरील शंकाही दूर झाल्या आहेत. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर, दूरसंचार मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्याद्वारे यासंदर्भात देशात कोणतीही अडचण येणार नाही. या समस्येबाबत आयआयटी मद्रासमध्ये अभ्यास करण्यात आला. आयआयटीच्या अभ्यासानुसार, गॅपिंगमुळे अमेरिकेत जी समस्या उद्भवली ती भारतात होणार नाही. या सेवेच्या माध्यमातून जलद इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. ज्याद्वारे उच्च दर्जाचे व्हिडिओ, फोटो आणि कागदपत्रे काही सेकंदात डाउनलोड करता येतील.
 
5G सेवेमध्ये, मॉडेम 1 चौरस किलोमीटरमध्ये 1 लाख कम्युनिकेशन उपकरणांना सपोर्ट करेल. 4G पेक्षा 10 पट अधिक वेगवान अशी ही सेवा असेल. 5G सेवा 3D होलोग्राम कॉलिंग, मेटाव्हर्स आणि एज्युकेशन ऍप्लिकेशन्समध्ये नवीन क्रांती आणेल. होलोग्रामच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांमध्ये मोठा बदल दिसून येईल. आरोग्य सेवेची माहिती अथवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या माध्यमाद्वारे संपर्क आणि माहितीची देवाणघेवाण सहज करता येईल.