हास्य सम्राट ... राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

    दिनांक : 21-Sep-2022
Total Views |
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव Raju Srivastava यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांकडून आणि सहकाऱ्यांकडून सतत अपडेट्स मिळत होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी आली होती मात्र आता त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली आहे.

raju shrivastav 
 
 
माहितीनुसार राजू Raju Srivastava दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्याच हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. कसरत करत असताना राजू यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक ट्रेडमिलवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राजूच्या मेंदूला दुखापत झाल्याची माहिती त्याच्या जवळच्या मित्रांनी दिली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पडल्यामुळे मेंदूपर्यंत बराच वेळ ऑक्सिजन पोहोचले नसल्याने त्यांना शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान उपचारादरम्यान त्याच्या शरीरात काही हालचाल झाल्याचेही समोर आले होते.
 
राजू श्रीवास्तव Raju Srivastava यांनी अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. ते देशातील लोकप्रिय कॉमेडियन होते. त्यांनी द ग्रेड इंडियन लाफ्टर चॅलेंज, बिग बॉस, शक्तीमान, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो असे अनेक शो गाजविले. याशिवाय, मैंने प्यार किया, तेजाब, बाजीगर यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. अलीकडेच ते इंडियन लाफ्टर चॅम्पियनमध्ये खास पाहुणे म्हणून दिसले होते. दरम्यान सुरवातीच्या काळात राजू मुंबईत संघर्ष करत असताना उदरनिर्वाहासाठी ते ऑटो चालवत असे. एवढेच नाही तर एका प्रवाशामुळेच राजू यांना मोठा ब्रेक मिळाला असे सांगण्यात येते.