विजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    दिनांक : 31-Aug-2022
Total Views |
एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावातील घटना
 
जळगाव : एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला (Mahavitaran Employee) बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे .
 
 

marhan 
 
 
सध्या सोशल मीडियावर (Social Media) या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या मनोज पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सविस्तर वृत्त असे कि , एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मोठ्या दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. महावितरण विभागाचे कर्मचारी अक्षय महाजन हे अधिकाऱ्यांसह वीज चोरी करणारे आकडे काढण्यासाठी मंगळवारी एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात गेले होते. या दरम्यान गावात मनोज पाटील यांचे आकडे काढल्यावर तो वीज कर्मचारी अक्षय महाजन यांच्या मागे मोठा दांडका घेऊन मागे लागला. तसेच हातातील भल्या मोठ्या दांडक्याने वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
 
या मारहाणीत वीज कर्मचारी अक्षय महाजन यांना मोठी गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी जखमी वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली असून मारहाण करणाऱ्यावर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वीज कर्मचाऱ्यामधून होत आहे.