नोकरीच्या अमिषापोटी युवकाची सव्वापाच लाखात फसवणूक

    दिनांक : 23-Aug-2022
Total Views |

निंभोरी (जळगाव) : नोकरीस लावून देतो असे सांगत आमिष दाखवून युवकाकडून वारंवार पैशांची मागणी करत 5 लाख 25 हजार रुपयात गंडविण्याची घटना घडली आहे. आपली (Fraud) फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच युवकाने दोन जणांविरुद्ध (Pachora) पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
 
 
 
frud
 
 
 
सविस्तर वृत्त असे कि, आखतवाडे (ता. पाचोरा) येथील गणेश मोतीलाल गढरी (वय 32) यांना शिपाई पदावर नोकरी लावून देतो; असे सांगत गणेश गढरी यांचे चुलत मामा जगन गंगाराम पवार (रा. मोहलाई, ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांचे परिचयातील सागर रतन बागुल (रा. एकलहरे, ता. जि. नाशिक) व एस. पी. बोडखे (रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे) यांचेशी गणेश गढरी यांची ओळख करुन दिली. दरम्यान आपणास नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत 19 मार्च 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत गणेश गढरी यांचेकडून सागर बागुल यांनी त्यांच्या फोन पे वर वारंवार पैशांची मागणी करत 5 लाख 25 हजार रुपये घेतले.
 
गणेश गढरी यांनी सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना नियमित फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल यांचा मोबाईल बंद तर एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधीत मागून पैसे देतो, असे सांगत वेळ मारुन नेली. त्यामुळे गणेश गढरी यांनी सोमवार (23 ऑगस्ट) पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे‌. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.