धरणगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

    दिनांक : 25-Aug-2022
Total Views |
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांची कारवाई
 
जळगाव : पंचायत समिती धरणगाव येथे गुरुवार 25 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा सभेत स्वछ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आलेल्या बोरगाव व वाघळूद येथील दोघा ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
 
Zp
 
गुरुवारी धरणगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते .या आढावा सभेत उपस्थित झालेले मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाई मुळे आर.डी पवार व बी.डी बागुल या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.तर धरणगाव तालुक्यातील नांदेड, जाबोरे, रेल, सोनवद ,चालखेडा, दोनागाव, वराड येथील येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुबा ,वावडडे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे,वराड,बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.