जळगाव ते जालना रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन अंदाजपत्रकाला मंजुरी

    दिनांक : 06-Sep-2022
Total Views |
 
रेल्वेमार्गाच्या कामाला मिळणार गती !
 
 जळगाव ते जालना या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असल्याने या कामाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

rel
 
 
 
 
 
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेतल्याने व जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जळगाव ते जालना या नवीन रेल्वेमार्गाचे काम खर्‍या अर्थाने मार्गी लागले आहे. यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून याच्या अंदाजपत्रकाला देखील मंजुरी मिळाल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
 
रावसाहेब दानवे यांनी काल सिल्लोड येथील कार्यक्रमात याबाबतची माहिती दिली. जळगाव ते जालना या रेल्वे मार्गासाठी सुमारे आठ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग १७४ किलोमीटर लांबीचा असून या माध्यमातून मराठवाडा आणि खान्देशची शार्ट कटने कनेक्टीव्हिटी होणार आहे. यामुळे अर्थातच, प्रवाशांसह माल वाहतूकदारांनाही लाभ होणार आहे.