जळगावात परिचयातील तरुणांकडूनच अत्याचार

    दिनांक : 06-Sep-2022
Total Views |
चाकूचा धाक दाखवून अत्याचाराची तरूणीची तक्रार
 
जळगाव : चाकूचा धाक दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनोद सुकलाल भोळे (रा.सदोबा नगर, जळगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. १ सप्टेबर रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत ही घटना घडली आहे.
 
 
Rape
 
पोलिसांकडून याप्रकरणी प्राप्त माहिती अशी की, पीडित तरुणी एका महाविद्यालय पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पंधरा दिवसापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते त्यामुळे पीडिता एकटीच घरी होती. विनोद भोळे याच्याशी पीडित कुटुंबाचे घरोब्याचे संबंध असल्याने येणंजाणं सुरु होते. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता.
 
१ सप्टेबर रोजी रात्री ११ वाजता भोळे हा पीडितेच्या घरी गेला. त्याने पिडीतेला दरवाजा उघडायला लावला. घरात आल्यावर चाकूचा धाक दाखवून बाहेर निर्मनुष्यस्थळी घेऊन गेला. तेथे अंधार असल्याने तेथून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. घरात त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर एक तासाने तरुणीची सुटका केली. यावेळी त्याने डाव्या हातावर चाकू मारल्याने दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीने मंगळवारी शनीपेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.