राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन , 50 खोके देऊन आमदार विकत घेतल्याचा आरोप !

    दिनांक : 20-Sep-2022
Total Views |

पोलिसांनी आंदोलनापुर्वी  कार्यकर्त्यांना घेतले ताब्‍यात
 
जळगाव : राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जळगाव जिल्‍ह्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगावात आगमन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकारी, निषेध, आंदोलन, पोलीस, डाव, उधळला धिकाऱ्यांनी पन्नास खोके...एकदम ओके अशा घोषणा लिहलेले टिशर्ट घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी (हा डाव उधळून लावला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.
 
 
attak1
 
 
 
राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचे दुपारी साडेतीनच्‍या सुमारास (Jalgaon) जळगाव विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते पाळधी येथे कार्यक्रमासाठी जात होते. या पुर्वी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून मुख्‍यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याची तयारी होती. ज्यांनी 50 खोके देऊन आमदार विकत घेतले आहे असा आरोप करत एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आल्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.
 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात
 
राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनाच्‍या तयारीत होते. परंतु, पोलिसांनी आंदोलनापुर्वी कार्यकत्‍र्यांना ताब्‍यात घेतले. कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरिता या आंदोलन करण्यात येणार होते. त्याची माहिती मिळाल्‍याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना अटक करण्यात आल्‍याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.