धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला दगडफेकीमुळे गालबोट !

वाजंत्री बंद करण्याच्या कारणावरुन वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार

    दिनांक : 05-Sep-2022
Total Views |
जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री बंद करण्याच्या कारणावरुन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाद झाला त्यावरून पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

dhanora 
 
 
सविस्तर वृत्त असे कि, धानोरा येथे आठ गणेश मंडळे आहेत. पाचवा दिवस असल्याने तीन गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लवकर पुढे सरकल्या. त्याचवेळी सपोनि किरण दांडगे हे गावात पोहचले. आता १० वाजल्याने वाजंत्री बंद करण्याचे आदेश त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिेले. यावरुन पदाधिकारी व अधिकारी यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने पोलिसांनी थेट लाठीमार सुरु केला. अचानक हा प्रकार घडल्याने मिरवणुकीसाठी आलेले लोक पळू लागले. यानंतर काही वेळात दगडफेकही सुरु झाली. यात दोन चारचाकी वाहनांच्या काचा फुटल्या. गावात रात्री उशिरापर्यंत दोन मंडळाचे श्री विसर्जन थांबविण्यात आले होते.