जिल्हाधिकार्‍यांसह केंद्रीय पथकाद्वारे पहाणी

    दिनांक : 25-Aug-2022
Total Views |
पथकाची गोलाणी मार्केटमधील जलशक्ती केंद्रास भेट 
 
जळगाव : ‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यात जलशक्ती अभियान अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पूर्णत्वास आलेल्या ‘पाणीदार’कामांची केंद्रीय पथकातर्फे पहाणी करण्यात आली.
 

jalsampada 1 
 
 
दरम्यान, या पथकातील अधिकार्‍यांनी गोलाणी मार्केटमधील तिसर्‍या मजल्यावरील मृद, जलसंधारण उपविभागीय कार्यालयातील जलशक्ती केंद्रास भेट दिली. यावेळी केंद्र सरकारचे तांत्रिक अधिकारी मोहंम्मद रिजवान, हनुमंतप्पा, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जलशक्ती कंेंद्राचे सचीव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी एम.बी.मापारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, अभियंता स्वप्निल सूर्यवंशी आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी व त्या परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पातळी वाढावी, जिल्ह्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्यात १०० ठिकाणी ‘जलशक्ती’ अभियानांतर्गत अमृत सरोवरांची निर्मिती तसेच ‘एक गाव-एक तलाव’ योजना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. जलशक्ती अभियानांतर्गत आतापर्यंत बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहेत. अन्य कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास तसेच भविष्यात पाणीटंचाई मिटण्यास मदत होणार आहे.
 
विविध कामांना प्रारंभ
 
चाळीसगाव तालुक्यात अभोणे तांडा, आडगाव, ब्राह्मणशेवगे, एरंडोल तालुक्यात खर्ची खु., एरंडोल, वरखेडी पाझर तलाव, नागदुली, विखरण तलाव, जळगाव तालुक्यात कंडारी पाझर तलाव, वसंतवाडी तलाव, तालखेडे ता. मुक्ताईनगर, कुसुंबा बु., गुलाबवाडी, पाल, जिन्सी पाझर तलाव (ता.रावेर), वाकी, वरखेड बु.(ता.बोदवड). जलसंधारण, वन, जलसंपदा, कृषी विभाग, मनरेगा, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या तलावांची निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यात जलशक्ती अभियान अंतर्गत कामांची पाहणी करण्यासाठी केंेद्रीय पथकाचा दौरा २४ ते २६ ऍागस्ट असा तीन दिवसीय दौरा असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.