विद्यार्थ्यांनो यशवंत, गुणवंत व्हा, भविष्यात आईवडिलांना न विसरता परिवाराकडे लक्ष द्या

आ.अमरिश पटेल यांचे गुणवंत विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

    दिनांक : 18-Jun-2022
Total Views |
शिरपूर : विद्यार्थ्यांनो जीवनात अजून मोठे व्हा, यशवंत व गुणवंत व्हा, उज्ज्वल भविष्य घडवा पण भविष्यात आईवडिलांना न विसरता परिवाराकडे लक्ष द्या, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आ. अमरिश पटेल यांनी आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या दहावीच्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळया प्रसंगी केले. आर. सी. पटेल मेन बिल्डींग मधील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल मध्ये शनिवारी १८ रोजी दुपारी १२ वाजता आ. अमरिश पटेल यांच्या हस्ते आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या दहावीच्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा झाला.
 
 
amrishbhai 
 
 
यावेळी आ. अमरिश पटेल म्हणाले की, संस्थेचे ९२६ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केल्याची बाब गौरवास्पद आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राचार्य, शिक्षक यांचे योगदान मोठे असून सर्व कौतुकास पात्र आहेत. चांगली पिढी घडविण्यासाठी संस्थेत गुणवत्तेला प्राधान्य देवून शिक्षक भरती केली आहे. गुणवत्तेला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो, अनेकदा वाईटपणा घ्यावा लागतो. दहावी व बारावीच्या चांगल्या निकालाबद्दल गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे अभिनंदन करतो. देशातील सर्वोत्तम एस.व्ही.के.एम. संस्था मी मुंबईला चालवतो, तिथेही गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक कारभार चालतो. संस्थेतून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना भरमसाठ पगारावर नोकरी मिळते.
 
देशभरात मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, शिरपूर, इंदूर, न्यू मुंबई, धुळे, चंदिगड, अहमदाबाद तसेच शिरपूर येथे भव्य हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज सुरु करत आहोत. सर्वसामान्यांचे जीवनमान बदलण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासह पाण्याची मुबलक व्यवस्था आपण केली आहे. राजगोपाल भंडारी हे संस्थेच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात. सर्व प्राचार्य, शिक्षक यांनी कायम परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे.
 
व्यासपीठावर आ. अमरिश पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, इंग्लिश स्कूल चेअरमन योगेश भंडारी, फिरोज काझी, जाकिर शेख, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, मुख्याध्यापक अमोल परब, सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक एन. ई. चौधरी, पर्यवेक्षक जे. पी. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. ई. चौधरी यांनी तर आभार पी. व्ही. पाटील यांनी मानले.
 
कार्यक्रमाला आर. एन. पवार, व्ही. पी. दिक्षित, व्ही. आर. सुतार, एन. सी. पवार, पी. आर. साळुंखे, आर. एफ. शिरसाठ, के. आर. जोशी, एस. एन. जोशी, पी. एन. गोसावी, सौ. एन. पी. देवरे, एस. ए. कुरेशी, के. एस. मराठे, ए. एच. जाधव, एच.के.कोळी, के. जे. राजपूत, पी.डी.पावरा, मुबिनोद्दीन शेख, रविंद्र खुटे, भटू पाटील, नितीन राजपूत, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. दहावीच्या निकालात आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व २१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. संस्थेच्या १७८५ विद्यार्थ्यांपैकी सर्व १७८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल १०० टक्के लागला.
 
संस्थेतील ९२६ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. संस्थेचे १७६८ विद्यार्थी म्हणजेच ९९.०५ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. शहरातील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा रविंद्र भावसार ९७.२० टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम, विज्ञान विषयात निलाक्षी जगदिश गिरासे व हिताक्षी योगेशकुमार पाटील यांनी १०० गुण प्राप्त केले.