देवरे अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन मध्ये स्पंदन २०२२ चा शुभारंभ

    दिनांक : 13-May-2022
Total Views |
धुळे : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांच्या अविष्कार असणार्‍या दोन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अर्थात स्पंदन २०२२ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य शुभारंभ शनिवार दि १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महाविद्यालयाचे अध्यक्ष मा दादासाहेब सुभाष देवरे यांच्या शुभ हस्ते तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य प्रमोद कचवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. स्पंदन २०२२ चे समन्वयक प्रा डॉ अभिजीत मोरे, प्रा डॉ शैलैश देवरे, प्रा हर्षल देशमुख, प्रा संजय हिरे, प्रा शोएब काझी सर्व विभाग प्रमुख, रजिस्ट्रार, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
 
 
 spandan
 
 
गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन मुळे संख्येचे निर्बंध असल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य नव्हते, दोन - तीन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात स्पंदन २०२२ चे आयोजन होत असल्याने विद्यार्थ्यांमधे वेगळाच उत्साह आहे व महाविद्यालय परिसरात चैतन्याचे वातावरण अनुभवले जात आहे.
दि १३ मे रोजी सकाळ च्या सत्रात थीम डे व कॅरेक्टर डे ने या सोहळ्यास सुरुवात होत आहे. दि १४ मे रोजी सकाळच्या सत्रात हॅलोविन /गृप /मिसमॅच डे चे आयोजन होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता स्पंदन २०२२ चा औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.