साक्री तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पांझरा व कान या नद्यांनी केले रौद्ररूप धारण !

    दिनांक : 11-Jul-2022
Total Views |
 
वीस गावांचा संपर्क तुटला ! पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडकले नागरिक
 
धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरामध्ये पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. आणि पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्यामुळे सकाळपासून नागरिक पुलाच्या (Dhule News) दुसऱ्या बाजूला अडकले आहेत. दहिवेल येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास वीस गावांचा संपर्क तुटला आहे.
 

panzara 
 
 
नंदुरबार ढोल पाडा लघु मध्यम प्रकल्प ओवर फ्लो
 
ढगफूटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झाल्यामुळे या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही; तोपर्यंत या नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूलाच पुराचे पाणी कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे.
 
पांझरा, कान नदीने केले रौद्ररूप धारण
 
ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने गावात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. शिवाय साक्री (sakri) शहरातून वाहणारी पांझरा व कान या दोन्ही नद्यांनी अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून कान नदीला पूर आल्याने नदीवरील दोन पूल हे संपूर्ण पाण्याखाली आले आहे.