केमिकल टँकर आणि ट्रकच्या धडकेनंतर आगीचा भडका, दोघांचा होरपळून मृत्यू

    दिनांक : 01-Feb-2022
Total Views |
धुळे : येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dhule  
 
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. ४.२० वाजेच्या सुमारासही घटना घडली. मध्यप्रदेशहुन महाराष्ट्रात भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला. काही कळायच्या आतच टँकरने पेट घेतला. यावेळी टँकरमधून मोठा स्फोट होऊन आगीने रौद्ररूप धारण केलं केलं होतं.
 
 
 
हा अपघात इतका भीषण होता की, काही क्षणात संपूर्ण टँकर जळुन खाक झाला असून यात टँकर चालक व सहचालक अडकून आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यवक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर स्फोटाचे मोठे आवाज झाल्याने महामार्गावरील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. दरम्यान अपघातानंतर पोलीस व बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
 
दरम्यान आगीचे लोळ सुरू असल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून आग विझल्यानंतरच नेमका किती जीवितहानी झाली हे समजू शकणार आहे.