१०० रुपयांच्या लाच प्रकरणी कारकूनास अटक

    दिनांक : 09-Jun-2022
Total Views |
धुळे : मतदार यादी मधील नाव दुरुस्त करण्यास शंभर रुपयांची लाच घेणाऱ्या शिंदखेडा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे (52, रा.सूर्योदय कॉलनी देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच रंगेहाथ अटक केलेली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटाची झोप उडाली आहे.
 
 
 ganu
 
 
32 वर्षीय तक्रारदार यांच्या आईचे नाव भुराबाई नानसिंग गिरासे असे असून त्यांचे आईचे नाव मतदार यादीत चुकीने उजनकोरबाई नानसिंग गिरासे असे नमूद आहे. वरील दोन्ही नावाचे व्यक्ती एकच असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रावर नमूद माहिती साक्षांकन करण्याचे मोबदल्यात आरोपी अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी शंभर रुपयांची लाच मागितली होती व त्याबाबत तक्रार केल्यानंतर पडताळणी होवून सापळा रचण्यात येऊन आरोपीने लाच स्वीकारताच त्यास तात्काळ अटक करण्यात आली.
 
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, संदिप कदम, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.