विधानपरिषदेवर धुळे-नंदुरबार मतदार संघातून अमरिशभाई पटेल बिनविरोध

    दिनांक : 26-Nov-2021
Total Views |
शिरपूर : धुळे - नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी झालेल्‍या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा अमरिश पटेल यांचा विजय झाला आहे. विजय निश्चित झाल्यानंतर अमरीश पटेल यांच्या शिरपूर येथील घराबाहेर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष केला.

Amrishbhai_1  H 
 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे व नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे येथील आमदार अमरीशभाई पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. अमरीशभाई पटेल हे २००९ पासून धुळे– नंदुरबार मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात देखील विजय मिळविला होता. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत आहेत.
 
निवडीनंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून सत्कार
 
भारतीय जनता पार्टी तर्फे धुळे नंदुरबार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून माजीमंत्री आ.अमरीशभाई पटेल बिनविरोध निवडुन आल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा गृहनिर्माण व श्रेत्रविकास महामंडळ (म्हाडा) नाशिक विभाग माजी उपसभापती बबनराव चौधरी, आ.काशिराम पावरा यांनी सत्कार केला. याप्रसंगी धुळे जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जि.प.सदस्य देवेंद्र पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, राजगोपाल भंडारी, संजय आसापुरे, प्रताप सरदार, राहुल रंधे, सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, रोहित शेटे, रवींद्र भोई, मुबीन शेख, विक्की चौधरी, राधेश्याम भोई, अनिल बोरसे, अमोल पाटील, रफीक तेली, भुरा राजपुत, संतोष माळी, हर्षल राजपुत, भटु माळी, शामकांत ईशी, नितीन राजपुत, विनायक कोळी, संजय राजपुत, भालेराव माळी, नरेंद्र पाटील, अनिल पाटील, निलेश देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार - अमरीशभाई पटेल 
काॅंग्रेसचे उमेदवार गाैरव वाणी यांनी आज भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांच्या विराेधातील अर्ज मागे घेतल्याने पुन्हा एकदा धुळे- नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात पटेल यांचा विजय झाला आहे. या विजया नंतर अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सर्व मतदारांचे आणि भाजप नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले हा विजय सर्व मतदारांच्या एकजूटीमुळे झाला आहे. ते सर्व माझ्या साेबत राहिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे. खरंतर मला लढायचं हाेतं परंतु आता ती इच्छा अपुर्ण राहिली आहे.
अमरीशभाई म्हणाले दाेन्ही जिल्ह्याचा विकास कसा हाेईल याकडे लक्ष राहील. पालिका, जिल्हा परिषदेत ज्या अडचणी येतात ते साेडविल्या जातील. खास करुन शिरपूरचा विकास कसा हाेईल यासाठी प्रयत्नशिल राहीन. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितीच प्रयत्न राहतील असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
दिल्लीत दाेन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी उमेदावारी मागे घेण्याबाबत निश्चित केले. त्यामुळे विराेधकांनी अर्ज मागे घेतले. काेल्हापूरात काॅंग्रेसचे सतेज पाटील हे बिनविराेध झाले. येथे भाजप पक्ष बिनविराेध झाला आहे असेही पटेल यांनी नमूद केले.