साक्री महाविद्यालयात, राष्ट्रीय ग्राहक पंचायत दिन साजरा

    दिनांक : 24-Dec-2021
Total Views |
साक्री : येथील विमलबाई पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.एस.सोनवणे होते. यावेळी नायब तहसीलदार गोपाळ पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे साक्री तालुकाध्यक्ष प्राचार्य बी.एम.भामरे, प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पारख, डॉ.दिलीप चोरडिया, सचिव विलास देसले, डॉ.सचिन नांद्रे, प्रणेता देसले, के.एस.बच्छाव, जोशीला पगारीया उपस्थित होते.
  
sakri_1
 
ग्राहकांचे हक्क व कर्तव्य तसेच वस्तू खरेदी करतांना घ्यावयाची काळजी तसेेच सायबर फसवणूक याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. ग्राहक दिन साजरा करतांना जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने असा कार्यक्रम व्यापक होण्यासाठी ग्राहक पंचायतच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन जिल्हा सहसंघटक पी.झेड.कुवर यांनी केले तर आभार विलास देसले यांनी मानले. याप्रसंगी ग्राहक पंचायतचे डॉ.सचिन नांद्रे, प्रा.अजय नांद्रे, प्रणेता देसले, डॉ.दिलीप चोरडीया, श्रीमती जोशीला पगारीया, सुषमा अहिरे यांचा त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.