'१ मे'ला तहसीलदार पती विरोधात पत्नीचे उपोषण

    दिनांक : 25-Apr-2022
Total Views |
पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तहसीलदाराचे दुसरे लग्न? 
 
शिंदखेडा : वैशाली सुनील सौंदाणे या शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सौंदाणे यांची धर्मपत्नी असून त्यांनी विभागीय महसूल आयुक्तांना निवेदनात महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुलांसोबत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
 
 
Shindkheda 1
 
वैशाली सुनील सौंदाणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सौंदाणे यांची मी (वैशाली सुनील सौंदाणे) धर्मपत्नी आहे. आम्हाला मुलगी अनधा (वय 19 वर्ष) , व मुलगा आदित्य वर्धन (वय 13 वर्ष), अशी दोन अपत्ये आहेत. आमचे दोघांचे अजूनही लग्न संबंध टिकून असून कोणत्याही प्रकारची कायदेशीर फारकत झालेली नाही, असे असतांना माझे पती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी मीना बोडके या नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवून तिला कागदोपत्री फेरफार करून पत्नीचा दर्जा देण्याचा आरोप देखील त्यांनी या निवेदनात केला आहे.
 

Shindkheda 2