आर सी पटेल महाविद्यालयात तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

    दिनांक : 23-May-2022
Total Views |
 
शिरपूर : येथील आर. सी. पटेल महाविद्यालयात संगणक विभागातर्फे बक्षीस वितरण सोहळा व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील तर उपप्राचार्य डॉ.ए.एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
shirpur 
 
 
प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करत आपल्या महाविद्यालयात एम.एस्सी. संगणक शास्त्र या विषयासाठी दालने खुले आहेत, असे सांगितले. प्रास्ताविक संगणक विभाग प्रमुख प्रा. बी.एस.पंचभाई यांनी केले. कार्यक्रमास संगणक विभागातील प्रा.एस.डी.मोने, प्रा.ए.जे. माहेश्वरी, प्रा.डी.ई.चव्हाण, प्रा. जी.के.पाटील, प्रा.पूजा हजारे, प्रा.अ.स.भोलाणे, गणेश सोनार तसेच एस.वाय.बी.एस्सी. व टी.वाय.बी.एस्सी.चे विद्यार्थी उपस्थित होते.