शिंदखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय निधीसाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन

    दिनांक : 22-Aug-2021
Total Views |
शिंदखेडा : शिंदखेडा विकास संघर्ष समितीने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना जन आशीर्वाद यात्रा निमित्त चिमठाणे ता. शिंदखेडा येथे आले असतांना निवेदन देण्यात आले.
 
शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहर व परिसरातील सुमारें 45 गावांतील लोकसंख्या एक लाखाच्या पलीकडे आहे. तरी या नागरिकांचा संपर्क नेहमी शिंदखेडा शहराशी येत असतो. शहरातील व परिसरातील नागरिक आरोग्याच्या सुविधेसाठी पूर्णतः शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयावर निर्भर आहेत. परंतु आरोग्याच्या कमी सुविधा, डॉक्टरर्स-कर्मचारी यांची कमतरता, x ray मशीन चालक नसणे, ऑक्सिजन नसने इ. बऱ्याच आरोग्याच्या सुविधा नसणे व वेळेवर उपलब्ध न होणे. यामुळे येथे नागरिकांना धुळे, शिरपूर वा इतर मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागते. अति संवेदन परिस्थितीत तर रुग्णाला इतर ठिकाणी हलविताना प्राणाला ही मुकावे लागते. कोरोना कालखंडात तर येथील नागरिकांना खूपच त्रास व हाल सहन करावा लागला.अश्या अनेक समस्या चे घर असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर जर उपजिल्हा रुग्णालयात झाले तरी सुविधा अधिक मिळतील व शहरात कोणतेही खाजगी विशेष डॉक्टर नसल्यामुळे त्यांचीही कमतरता पूर्ण होईल.यासाठी शिंदखेडा विकास संघर्ष समिती मागील 2 वर्षांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री,धुळे जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक यांना याविषयावर निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधत आहे.

shinadakheda_1   
 
तसेच केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री जन आशीर्वाद यात्राच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शिंदखेडा विकास संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, माजी मंत्री आमदार जयकुमार रावळ व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना निवेदन दिले व याविषयासाठी त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा करण्याची मागणी केली.
यापूर्वी ही याविषयाची जनभावना शासना पावेतो पोहचावी यासाठी स्वाक्षरी मोहीम ही सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय राज्य मंत्री यांना निवेदन देऊन विषयाचे गांभीर्य समितीचे सदस्य अमोल भगवान मराठे, प्रा. अनिल माळी, प्रा. उमेश चौधरी, प्रविण माळी व योगेश माळी यांनी समजावुन सांगितले दरम्यान सदर उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी मंत्री डॉ.भारती पवार यांनी सकारात्मक ता दाखवली यासाठी निश्चित प्रयत्न करु असे शिष्टमंडळास आश्वासन दिले.