क्रीडा

माजी क्रिकेटपटू, क्यूरेटर गोपालस्वामी कस्तुरीरंगन कालवश

माजी क्रिकेटपटू, क्यूरेटर गोपालस्वामी कस्तुरीरंगन कालवश..

नेमारने तोडला वैद्यकीय प्रोटोकॉल, फायनलसाठी बंदीची शक्यता

 मुंबई  ब्राझीलचा स्टार फुटबॉल नेमार याच्यावर चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. मंगळवारी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात लाइपत्सिगविरुद्ध पीएसजीच्या विजयानंतर नेमार कॅमेर्‍यावर शर्टची अदलाबदल करताना पकडला गेला.  नेमारने मार्सेल हॅल्स्टनबर्गबरोबर आपला शर्ट बदलला. पीएसजीने प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यूईएफएच्या नवीन वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, नेमारवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते आणि ..

धावपटू हिमा दासने सुवर्णपदक केले ‘कोरोना वॉरियर्स’ यांना समर्पित

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये झाली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले होते. संघात धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. यावेळी हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या ..

टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव, बोर्ना कोरीक कोरोनाबाधित

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातही कोरोनाचा शिरकाव झाला असून यानंतर आता दोन टेनिसपटूही कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. बल्गेरियन टेनिस स्टार ग्रिगोर दिमित्रोव आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर कोरीकने याची पुष्टी केली...

सारा, अर्जुनसह योगासनं करुन सचिनने साजरा केला फादर्स डे

मुंबई : जागतिक योग दिन आणि पितृदिन जगभरात साजरा झाला. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या कठीण काळात ६ वा योगदिन घरीच योगा करुन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळे ’घरी योगा आणि सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या सोबत योगासने करुन सचिनने आजचा फादर्स डे सेलिब्रेट केला आहे. त्याचबरोबर योगदिनाचे महत्त्व देखील राखले गेले आहे. वृक्षासन करतानाचा सारा, अर्जुन सोबतचा फोटो सचिनने शेअर केला आहे...

श्रीकांतची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली : भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे. याउलट अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणार्‍या प्रणॉयला संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे...

7 वर्षानंतर श्रीसंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेला भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला बीसीसीआयने दिलासा दिल्यानंतर आता सात वर्षानंतर तो क्रिकेट खेळताना दिसू शकतो. केरळ क्रिकेट असोसिएशनने रणजी संघात त्याची निवड केली आहे. श्रीसंत भारताच्या 2007 टी-20 आणि 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता. 2013 च्या आयपीएल स्पर्धेत तो स्पॉट फिक्सिंगमध्ये असल्याचे दिसताच त्याच्यावर मंडळाने कायमची बंदी घालून त्याला क्रिकेटपासून दूर केले होते. याविरूध्द त्याने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ..

बार्सिलोनाचा मार्लोका संघावर विजय

माद्रिद : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय स्पॅनिश लीग फुटूबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना महत्त्वपूर्ण गोल करताना बार्सिलोना संघाला मार्लोका संघावर विजय मिळवून दिला...

चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणार्‍याला इरफानची मदत

चेन्नई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हातावरचे पोट असणार्‍यांचे हाल होत आहेत. असेच सध्या चेन्नईमधील एक चांभार देखील संकटात सापडला आहे. आर भास्करन नाव असलेला हा चांभार सर्वाधिक कमाई आयपीएल दरम्यान करतो. पण सध्या आयपीएलचा १३ वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला असल्याने त्यांना रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशावेळी इरफान पठाण त्यांच्या मदतीला धावून आला आहे...

टी-२० क्रिकेट होणार अतिआक्रमक

मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा टी-२० क्रिकेट दाखल झाले तेव्हाच त्याच्या आक्रमकतेची चर्चा होऊ लागली. आता या क्रिकेटचा वेग आणखी वाढवून जास्त लोकप्रिय करण्यासाठी काही नियम प्रायोगिक तत्त्वावर राबवले जाणार आहेत...

जुलै-ऑगस्टमधील क्रिकेटचे टीम इंडियाचे दोन दौरे रद्द

India Team_1 H नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेला धोका लक्षात घेता श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौर्‍यावर भारतीय क्रिकेट संघ जाणार नसल्याचे जाहीर केले. २४ जून जूनपासून भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौर्‍यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती, पण आता ..

मोहम्मद शमी या वर्षीचा सर्वात यशस्वी गोलंदाज

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी एकदिवसीय सामन्यांमध्ये गडी बाद करण्यात यंदाचा सर्वांत यशस्वी खेळाडू ठरला. त्याने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 गड्यांना बाद केले. ..

टी-ट्वेंटी रँकिंगमध्ये भारतीय संघाच्या तीन फलंदाजांचा समावेश

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी लढतीच्या मालिकेतील तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 5 स्थानांची झेप घेत आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये 10 स्थानावर मजल मारली आहे. तसेच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 गुणांकनात तीन भारतीय फलंदाजांनी टॉप 10 फलंदाजांत स्थान मिळवले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजची धुलाई भारतीय संघाच्या चांगलीच पथ्थ्यावर पडलेली दिसत आहे...

पोलार्ड आणि वानखेडेच जुनं नातं; होऊ शकतो हा धोका...

वानखेडे स्टेडियम आणि पोलार्ड यांचे वेगळे नाते आहे. पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे आणि येथील खेळपट्टीचा त्याला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पोलार्डचा हा अनुभव संघाच्या कामी येईल, असं मत विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले...

विराटने असा केला विल्यम्सचा हिशेब चुकता

वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. पण कालच्या टी-ट्वेंटी सामन्यात चक्क विराट कोहलीने आपल्या खेळीचे असे काही सेलिब्रेशन केले कि सारे अवाक झाले. निमित्त ठरले विंडीजचा गोलंदाज केसारिक विल्यम्सन. इंडिजचा गोलंदाज केसरिक विल्यम्स खेळाडूला बाद केल्यानंतर विराटने डायरीचे पान फडल्यची नक्कल करत दोन वर्षापूर्वीच्या आपल्या वर केलेल्या टिंगलचा हिशेब चुकता केला. ..

विराट कोहलीच्या तुफानी खेळीमुळे भारताचा पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात विजय !

वेस्ट इंडीज कडून मिळालेले २०८ धवनचा पाठलाग भारतीय संघाने ८ चेंडू बाकी ठेवत पूर्ण केला व पहिला टी-ट्वेंटी सामना आपल्या नावे केला आहे. कर्णधार विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान भारतीय संघाने शुक्रवारी वेस्ट इंडीजवर सहा गडी व आठ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. ..

U19 WORLDCUP: विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड

आगामी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत रंगणा-या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा यंदा प्रियम गर्गकडे तर ध्रुव चंद जुरेल वर उप-कर्णधारपद सोपविण्यात आले आहे...

लखनौ येथील एकमेव कसोटीत वेस्ट इंडीज विजयी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पण, भारताचा सामना करण्यापूर्वी वेस्ट इंडिड संघाला मोठा बूस्ट मिळाला आहे. लखनौ येथे खेळवण्यात आलेल्या एकमेव कसोटी सामन्यांत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. ..

सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला विजय

सुपर लीगमध्ये 'अ' गटात महाराष्ट्राचा दुस-या सामन्यातील हा पहिला विजय ठरला असून ६७ धावांनी बडोद्याच्या संघाला धूळ चारली आहे...

दुसरा कसोटी सामनाही भारतच्या खिश्यात; बांगलादेशचा उडवला धुव्वा !

कोलकाताच्या ईडन गार्डनवर मैदानावर 1 डाव आणि 46 धावांनी बांगलादेश पराभूत ..

बहुप्रतिष्ठित फिफाचे 'या' भारतीय खेळाडूंना निमंत्रण

   मुंबई : जगभरात प्रसिद्ध असलेला 'फिफा' फुटबॉल विश्वचषक २०२२ रोजी कतारमध्ये होणार आहे. क्रिकेटनंतर भारतात फुटबॉलही तेवढ्याच आवडीने पहिला जातो आणि खेळला जातो. यावेळी कतारमध्ये खेळण्यात येणाऱ्या फिफा २०२२च्या आयोजन समितील वरिष्ठ सदस्याने भारतीय क्रिकेट संघाला सामने पाहण्यास निमंत्रित केले आहे.  आयोजक नासीर अल खतेर म्हणाले, "२०२२ साली होणारा फुटबॉल विश्वकरंडक आपल्यासाठी एका उत्सवाप्रमाणे असणार आहे. भारतात क्रिकेट हा एवढा मोठा खेळ आहे, याचा अंदाज मला नव्हता. १९८३ साली विंडीज हरवून ..

अटीतटीच्या सामन्यामध्ये भारत पराभूत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारत मालिका २-१ अशी जिंकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २१२ धावा केल्या. प्रतिउत्तरात भारत २० षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात २०८ धावा करु शकला...

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत डॉ.वृषाली पाटील यांना सुवर्णपदक

   जळगाव, १४ फेब्र्रुवारीअ.भा.बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने गोवा येथे ४३ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगावच्या डॉ.वृषाली पाटील नाहिद दिवेचा या जोडीने ४५ वर्षावरील गटात विजेतेपदासह सुवर्णपदक प्राप्त केले. ४५ वर्षावरील दुहेरीच्या गटात राष्ट्रीय स्पर्धेत ३२ प्रवेशिका होत्या. निकाल पुढीलप्रमाणे- शिखा खुंडरी व अजिता रविंद्रन या जोडीचा २१/१५, २१/१९, श्रीदेवी गांधीली व रूचिता शर्मा जोडीचा २१/१३, १६/२१, २३/२१, दीपाली जोशी व चैत्राली नवरे जोडीचा १०/२१, २१/१४,२१/१७ अंतिम सामन्यात डॉ.वृषाली ..