रितू फोगट वि. फेयरटेक्स अंतिम सामना आज

    दिनांक : 03-Dec-2021
Total Views |
सिंगापूर : कुस्तीकडून मिश्र मार्शल आर्ट प्रकाराकडे वळलेली भारताची रितू फोगट 3 डिसेंबर रोजी जागतिक स्तराच्या वन वुमन अ‍ॅटमवेट वर्ल्ड ग्रांप्री एमएमए स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या स्टॅम्प फेयरटेक्सविरुद्ध झुंजणार आहे. गत 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या वन वुमन अ‍ॅटमवेट वर्ल्ड ग्रांप्री उपांत्य सामन्यात रितूने फिलीपिन्सच्या जेनेलिन ऑलसिमवर अतुलनीय विजय नोंदविला. 27 रितू फोगट आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.
 

ritu_1  H x W:  
 
 
हा सामना माझ्या कारकीर्दीसाठी व भारताच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचा आहे. कारण यापूर्वी कोणतीही भारतीय महिला एमएमए विजेती झाली नव्हती. आता मला इतिहास रचण्याची संधी आहे तसेच जागतिक एमएमए क्षेत्रात भारतीय महिलांना स्थान मिळवून देण्याची क्षमता आहे. भारताला अभिमान वाटावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे रितू फोगट म्हणाली. ‘वन ः विंटर वॉरियर्स’ नामक ही लढत 3 डिसेंबर रोजी सिंगापूर इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. फेयरटेक्स ही माजी वन अ‍ॅटमवेट खेळाडू असून ती किकबॉक्सिंगमधील विश्वविजेती आहे.