बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय...टी-20 मालिका पुढे ढकलली

    दिनांक : 04-Dec-2021
Total Views |
नवी दिल्ली: न्यूझीलंड मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार पसरल्यामुळे या दौऱ्याची सतत चर्चा होत होती. अश्यातच आज बीसीसीआयने एका महत्त्वाच्या बैठकीत या दौऱ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सोबतच बोर्डाचे सचिव जय शाह यांनी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला दुजोरा दिला आहे.

bbci_1  H x W:  
 
 
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. येथे टीम इंडिया तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. चार सामन्यांची टी-२० मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ तीन कसोटी आणि तितक्याच एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया या दौऱ्यावर टी-20 मालिका खेळणार नाही, असे जय शाह यांनी सांगितले आहे.
 
भारतीय संघाला 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. यानंतर दुसरा सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. शेवटचा सामना पुढील वर्षी 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. पहिला एकदिवसीय सामना 11 जानेवारीला होणार आहे. यानंतर 14 आणि 16 जानेवारीला शेवटचे दोन सामने होणार आहेत.