अचानक आली गुप्त बातमी अन... पाकिस्थानात आलेल्या न्यूझीलंड संघाने घेतला परतण्याचा निर्णय

    दिनांक : 17-Sep-2021
Total Views |
नवी दिल्ली : तब्बल 18 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, दोन्ही संघात होणारा हा सामना न्यूझीलंडने रद्द केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. 
 

newzi_1  H x W: 
 
न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणेने न्यूझीलंड संघाबाबत सेक्युरी अलर्ट दिला आहे. न्यूझीलंड संघावर दहशदवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं अखेर सामना रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपुर्ण दौरा देखील रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा मोठा धक्का आहे, याची आम्हाला जाण आहे. परंतु खेळाडूची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे, असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेव्हीड व्हाईट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघासह एकदिवसीय मालिका खेळण्यास आलेल्या श्रीलंका संघावर 16 मार्च 2009 रोजी दहशदवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे.