Thursday, 7 August, 2025

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

टीम इंडियासाठी पुन्हा खेळणार कुलच्या : रोहित शर्मा

    दिनांक : 05-Feb-2022
Total Views |
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये रविवारी भारत वेस्ट इंडिजविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा पत्रकार परिषद घेतली. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव म्हणजेच कुलच्या ही जोडी पुन्हा खेळताना दिसेल का? असा प्रश्न कर्णधार रोहित शर्माला विचारण्यात आला. यावर रोहित शर्माने ही जोडी पुन्हा एकत्र खेळताना दिसेल असे संकेत दिले आहेत. रोहित शर्माने कुलच्याचं कौतुकही केलं.
 

kuldip 
 
 
कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल बऱ्याच कालावधीनंतर एकत्र भारतीय संघात दिसले आहेत. कुलदीपने जुलै 2021 मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. कुलदीप यादवने 65 एकदिवसीय सामन्यात 107 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवने सात कसोटी आणि 23 टी20 सामनेही खेळले आहेत.
 
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यापूर्वी बोलताना रोहित शर्माने कुलच्या जोडी खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्मा म्हणाला की, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी एकत्र गोलंदाजी केल्यास निकाल चांगला लागेल. हे दोन्ही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहे. दोघे एक्तत्र असतील तर नक्कीच प्रभाव दिसून येतो.
 
ईशान किशन सलामीला -
 
पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ईशान किशन  सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई इंडियन्ससाठी रोहित आणि ईशान यांनी सलामीची भूमिका पार पाडली आहे. आता भारतीय संघासाठी रोहित-ईशान सलामीची भूमिका पार पाडणार आहे. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, 'ईशान किशन एकमात्र पर्याय आहे. तो पहिल्या सामन्यात सलामीला येईल. मयंक अग्रवालचा विलगीकरणाचा कालावधी अद्याप पूर्ण झाला नाही. नियम सर्वात आधी येतात. जे खेळाडू प्रवास करुन आलेत, त्यांना नियमांनुसार विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागेल. जर दुखापत नसेल तर ईशान किशन रविवारी होणाऱ्या सामन्यात सलामीला येईल.
 
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
 
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-20 सामने दोनच मैदानांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही टी-20 सामने कोलकात्यात खेळवले जातील.
 
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 
एकदिवसीय मालिका -
 
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
 
टी-20 मालिका
 
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
अन्य बातम्या