मुंबई विरुद्ध कोलकाता आज सामना रंगणार

    दिनांक : 23-Sep-2021
Total Views |
मुंबई : आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात, विजय मिळवणे हेच मुंबईचे लक्ष्य असणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माची दुखापत हे मुंबई इंडियन्स साठी चांगली गोष्ट नाही. यामुळे आजच्या सामन्यात रोहित खेळणार की नाही, याबाबत अजूनही शंका आहे. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्मा या सामन्यात खेळेल असे संकेत दिले होते.
 
kohali_1  H x W 
 
मागील सामन्यात चेन्नई विरुद्ध मुंबईचा पराभव झाला होता. दुसरीकडे कोलकाताने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ९ गडी राखून दमदार विजय मिळवला होता. मागच्या सामन्यात रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या व्यतिरिक्त खेळला होता. दुखापतीमुळे या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. मुंबई आणि कोलकाता संघात आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २२ सामन्यात मुंबईने, तर ६ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. २०२० मध्ये आबुधाबीत झालेल्या स्पर्धेत एकूण ३ सामने पार पडले होते. त्यापैकी २ सामन्यात मुंबईत, तर एका सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे.