राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण

    दिनांक : 13-Nov-2021
Total Views |
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज  13 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात 2021 या वर्षाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करणार आहेत. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. मागील चार वर्षे क्रीडा क्षेत्रात दिमाखदार आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो.
 
sport_1  H x W:
 
खेळात तसेच क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी दिले जाणारे अर्जुन पारितोषिक हे मागील चार वर्षातील चांगली कामगिरी आणि नेतृत्वगुण, खिलाडू वृत्ती आणि शिस्तपालन करणाऱ्याला दिले जाते.क्रीडा आणि क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना त्यांनी सलगपणे केलेली गुणवत्तापूर्ण कामगिरी तसेच क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात. खेळ व क्रीडा स्पर्धातील कामगिरीसाठी दिला जाणारा ध्यानचंद जीवन गौरव म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट हा पुरस्कार आपल्या खेळातील कामगिरीने क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि खेळातील निवृत्ती नंतरही क्रीडा क्षेत्रात खेळासाठी योगदान देणाऱ्यांना दिला जातो.
 
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार
 
खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, क्रीडा नियंत्रण मंडळे, राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघ याशिवाय स्वयंसेवी संस्था ज्यापैकी क्रीडा क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावणाऱ्यांसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिले जातात. आंतरविद्यापीठीय सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA)ट्रॉफी दिली जाते. या पुरस्कारांसाठी या वर्षी मोठ्या संख्येने नामांकने प्राप्त झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील ख्यातनाम क्रीडापटू आणि क्रीडा पत्रकारिता व क्रीडा व्यवस्थापन यामधील अनुभवी व्यक्तींच्या निवड समितीने त्यांची छाननी केली.
 
पुरस्कारांच्या मानकऱ्यांची माहिती पुढीलप्रमाणे
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2021
 
1. Neeraj Chopra (Athletics)
2. Ravi Kumar (Wrestling)
3. LovlinaBorgohain (Boxing)
4. Sreejesh P.R (Hockey)
5. AvaniLekhara Para (Shooting)
6. SumitAntil Para (Athletics)
7. Pramod Bhagat Para (Badminton)
8. Krishna Nagar Para (Badminton)
9. Manish Narwal Para (Shooting)
10. Mithali Raj (Cricket)
11. Sunil Chhetri (Football)
12. Manpreet Singh (Hockey)
 
अर्जुन पुरस्कार 2021
 
Arpinder Singh (Athletics)
Simranjit Kaur (Boxing)
Shikhar Dhawan (Cricket)
Bhavani Devi ChadalavadaAnandhaSundhararaman (Fencing)
Monika (Hockey)
Vandana Katariya (Hockey)
Sandeep Narwal (Kabaddi)
HimaniUttamParab (Mallakhamb)
Abhishek Verma (Shooting)
Ankita Raina (Tennis)
Deepak Punia (Wrestling)
Dilpreet Singh (Hockey)
Harman Preet Singh (Hockey)
Rupinder Pal Singh (Hockey)
Surender Kumar (Hockey)
Amit Rohidas (Hockey)
Birendra Lakra (Hockey)
Sumit (Hockey)
Nilakanta Sharma (Hockey)
Hardik Singh (Hockey)
Vivek Sagar Prasad (Hockey)
Gurjant Singh (Hockey)
Mandeep Singh (Hockey)
Shamsher Singh (Hockey)
Lalit Kumar Upadhyay (Hockey)
Varun Kumar (Hockey)
Simranjeet Singh (Hockey)
Yogesh Kathuniya Para (Athletics)
Nishad Kumar Para (Athletics)
Praveen Kumar Para (Athletics)
SuhashYathiraj Para (Badminton)
SinghrajAdhana Para (Shooting)
Bhavina Patel Para Table (Tennis)
Harvinder Singh Para (Archery)
Sharad Kumar Para (Athletics)
 
द्रोणाचार्य पुरस्कार 2021
 
T. P. Ouseph (Athletics)
Sarkar Talwar (Cricket)
Sarpal Singh (Hockey)
Ashan Kumar (Kabaddi)
Tapan Kumar Panigrahi (Swimming)
Regular Category:
Radhakrishnan Nair P (Athletics)
Sandhya Gurung (Boxing)
Pritam Siwach (Hockey)
Jai Prakash Nautiyal Para (Shooting)
Subramanian Raman (Table Tennis)
 
मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2021
 
Lekha K.C. (Boxing)
Abhijeet Kunte (Chess)
Davinder Singh Garcha (Hockey)
Vikas Kumar (Kabaddi)
Sajjan Singh (Wrestling)
 
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2021
 
1. Identification and Nurturing of Budding and Young Talent Manav Rachna Educational Institution
2. Encouragement to sports through Corporate Social Responsibility Indian Oil Corporation Limited
 
मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2021
 
Panjab University - Chandigarh
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar