इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघाचा विक्रमी विजय

    दिनांक : 01-Dec-2021
Total Views |
डॉन्कस्टर : येथे झालेल्या महिलांच्या फिफा विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने लॅटव्हियाविरुद्ध 20-0 ने विक्रमी विजय नोंदविला. या सामन्यात 10 वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल नोंदविले असून यात चार हॅट्ट्रिकची नोंद झाली.
sport_1  H x W: 
 
इलिन व्हाईट संघाची सर्वकालीन आघाडीची गोल नोंदविणारी फुटबॉलपटू ठरली. तिने आतापर्यंत देशासाठी 40 गोल नोंदविलेले आहे. ऑक्टोबरमध्ये रिगा येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने लॅटव्हियावर 10-0 ने मात केली होती. यापूर्वी 2005 साली इंग्लंडच्या महिला संघाने हंगेरीविरुद्ध 13-0 असा मोठा विजय मिळविला होता. अन्य एकतर्फी ठरलेल्या सामन्यात आयर्लण्डने जॉर्जियावर 11-0 गोलने तसेच स्पेनने स्कॉटलंडवर तसेच ऑस्ट्रीयाने लक्झेमबर्गवर प्रत्येकी 8-0 गोलने विजय नोंदविले