ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार

    दिनांक : 26-Nov-2021
Total Views |
मुंबई : जगातील अव्वल कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ६५ वर्षात पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कमिन्सने टीम पेनची जागा घेतली आहे.
krida_1  H x W: 
 
 
एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका होणार आहे. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, ६९ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कमिन्स कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. १९५६ मध्ये रेमंड लिंडवॉल यांनी भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.
रे लिंडवॉल हे स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज होता. त्यांनी ६१ कसोटी सामन्यात २२८ विकेट्स घेतल्या आहेत. लिंडवॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारे शेवटचे वेगवान गोलंदाज होते. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला ही संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियात डेनिस लिलीपासून ग्लेन मॅकग्रापर्यंत उत्कृष्ट गोलंदाज होते.