मुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरनं रचला इतिहास

    दिनांक : 20-Nov-2021
Total Views |
मुंबई : क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणे ही मोठी उपलब्धी असते. टेस्ट, वन-डे आणि टी20 हे क्रिकेटचे प्रकार जसे लहान होत गेले तेवढं हा रेकॉर्ड करणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. या आव्हानात्मक प्रकारातही क्रिकेटपटू अधिक जिद्दीनं बॉलिंग करत नवे रेकॉर्ड करत आहेत. अबू धाबीमध्ये सध्या T10 लीग (T10 League) हा क्रिकेटचा सर्वात छोटा प्रकार खेळला जात आहे. या लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरनं फक्त 12 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मर्चंट डी लँगनं (Marchant de Lange) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये दोन ओव्हर्स म्हणजेच 12 बॉलमध्ये 5 विकेट्स घेत इतिहास घडवला आहे. तो T10 लीगमध्ये 5 विकेट्स घेणारा पहिला फास्ट बॉलर बनला आहे.
 
ex-bollor_1  H
 
 
यापूर्वी भारताच्या प्रवीण तांबेनं (Pravin Tambe) 2018 साली सिंधीज टीमकडून खेळताना केरला नाईट्स विरुद्ध फक्त 2 ओव्हरमध्ये हॅट्ट्रिकसह 5 विकेट्स घेतल्या होत्या. टीम अबू धाबी विरुद्ध बांगला टायगरशी (Team Abu Dhabi vs Bangla Tigers) होती. या मॅचमध्ये अबू धाबीकडून खेळताना डी लँगने हा विक्रम केला. 146 रनचा पाठलाग करताना बांगला टागर्सची सुरूवात खराब झाली.
लँगने दुसऱ्याच ओव्हरमध्ये बांगला टीमचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिसला शून्यावर आऊट केलं. त्यानंतर त्यानं आंद्रे फ्लेचर (24) , हजरतउल्लाह जजई (18), बेनी हॉवेल (15) आणि जेम्स फॉकनर (0) यांना आऊट केलं. लँगच्या या बॉलिंगमुळे बांगलाची टीम 10 ओव्हरमध्ये 8 आऊट 106 पर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे अबू धाबीला मोठ्या फरकानं विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा डी लँग हा यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यानं 5 आयपीएल मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला आजवर फक्त 2 टेस्ट, 4 वन-डे आणि 6 टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 26 विकेट्स घेतल्या आहेत. तर 122 टी20 मॅचमध्ये 141 विकेट्स घेतल्या आहेत.