मेस्सीच्या घरात चोरट्यांची हातसफाई

    दिनांक : 02-Oct-2021
Total Views |
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आपल्या परिवारासह एका पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्कामला आहे. या हॉटेलमधील मेस्सीच्या खोलीमध्ये चोरी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या चोरीमध्ये मौल्यवान दागिने आणि रोकड रक्कम चोरट्यांनी चोरून नेला. चोरीस गेलेल्या मालाची किंमत साधारण ४० लाख रुपये असल्याची माहिती आहे.
 
 messi_1  H x W: 
 
काही दिवसांपूर्वी मेस्सीने बर्सिलोना क्लब सोडून, पीएसजी क्लबसोबत करार केला आहे. त्यामुळे तो पत्नी आणि मुलांसह पॅरीस मधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. मेस्सी पीएसजी चँपियनशिप लीगचा सामना खेळून घरी परतल्यानंतर, त्याच्या हॉटेलमधील खोलीमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली.या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून तपास कार्य सुरु आहे.