दीपिका-रणवीरही होणार IPL संघांचे मालक?

    दिनांक : 22-Oct-2021
Total Views |
नवी मुंबई :  इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये दोन नवीन संघ जोडले जातील. म्हणजेच एकूण 10 संघ या स्पर्धेत असतील. या संघांना खरेदी करण्यासाठी मँचेस्टर युनायटेड सारख्या मोठ्या फुटबॉल क्लबचे मालक आणि फॉर्म्युला 1 चे माजी मालक यांचा आहे. त्याचबरोबर आता या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंह यांचे नावही सामील झाले आहेत. याशिवाय, भारतातील जिंदाल स्टील समूहाच्या मालकाचे नावही यादीत समाविष्ट आहे. संघ खरेदीसाठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबसमावेश र झाली आहे.
 


corona_1  H x W 
 
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नवीन आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी निविदाही सादर केल्या आहेत. आयपीएलशी बॉलिवूडचे कनेक्शन नवीन नाही. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या मालकीची आहे. तर प्रीती झिंटा पंजाब किंग्जची आणि शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्सची मालक आहे. यात आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचे नाव देखील जोडले जाण्याची शक्यता आहे. दीपिकाचे वडील देखील एका क्रीडापटू आहेत, तिचे वडील प्रकाश पादुकोण ऑल इंग्लंड बॅडमिंटनचे चॅम्पियन राहिले आहेत. त्याचबरोबर पती रणवीर सिंग सध्या फुटबॉलमध्ये इंग्लिश प्रीमियर लीगशी संबंधित आहे. तसेच तो लोकप्रिय बास्केटबॉल लीग NBA चा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत.