बांगलादेश-श्रीलंका सुपर-12 चा सामना आज

- टी-20 विश्वचषक क्रिकेट

    दिनांक : 24-Oct-2021
Total Views |
शारजाह :  टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी दुपारी शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये सुपर-12 फेरीत गट एकमधील बांगलादेश आणि श्रीलंका संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ विश्वचषकात आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यचा प्रयत्न करेल. श्रीलंका व बांगलादेशला सुपर-12 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी पहिल्या फेरीच्या गट पात्रता टप्प्यातून जावे लागले.
 
cricket_1  H x  
 
श्रीलंकेने तीनपैकी तीनही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान पटकावले, तर बांगलादेशने ब गटात स्कॉटलंडच्या पाठोपाठ दुसरे स्थान मिळविले. श्रीलंकेने नामिबियाचा सात गडी राखून पराभव केला व त्याआधी आयर्लंडचा 70 धावांनी पराभव केला. अखेरच्या पात्रता सामन्यात श्रीलंकेने नेदरलँडवर 8 गड्यांनी विजय नोंदविला. दुसरीकडे, बांगलादेशने सलामीच्या सामन्यात स्कॉटलंडकडून सहा धावांनी पराभव पत्करला. त्यानंतर बांगलादेशने ओमानवर 26 धावांनी, तर पापुआ न्यू गिनीवर 84 धावांनी विजय नोंदवून सुपर-12 साठी पात्रता सिद्ध केली.
परंतु आता श्रीलंका व बांगलादेश या दोन्ही संघांसाठी पुढील मार्ग खडतर असेल. या दोन्ही संघांना स्पर्धेत आणखी अव्वल संघांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. गट क‘मांक एक मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, गतविजेता वेस्ट इंडीज व दक्षिण आफि‘का संघांचा समावेश आहे.
 
प्रतिस्पर्धी संघ
 
श्रीलंका : दासून शनाका (कर्णधार), कुसल परेरा, दिनेश चंडिमल, धनंजया डीसिल्व्हा, पाथुम निसांका, चारिथ असालंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुश्मंथा चमेरा, लाहिरू कुमार, महेश कुमार, महेश कुमारी, दानुकी बिनुरा फर्नांडो.
 
बांगलादेश : महमुदुल्ला (कर्णधार), लिटन दास, मोहम्मद नईम, महेदी हसन, शकीब अल हसन, सौम्या सरकार, मुशफिकूर रहीम, नुरुल हसन (यष्टिरक्षक), अफिफ हुसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शमीम हुसेन, मुस्तफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन.