चेन्नई, दिल्ली पहिला क्वॉलिफायर सामना आज

    दिनांक : 10-Oct-2021
Total Views |
चेन्नई वि. दिल्ली पहिला क्वॉलिफायर सामना
 
स्थळः दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई
वेळ : सायंकाळी 7.30 वाजतापासून
थेट प्रसारण : स्टार स्पोर्टस्-1 वर
 
दुबई : चौदाव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात रविवारी पहिला क्वॉलिफायर सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील मजबूत फलंदाजांची फळी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील अनुभवी चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यात विजय नोंदवून दोन्ही संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असतील, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची आशा आहे. 
 
cricket_1  H x
 
 
दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघ म्हणून समोर आला आहे व त्यांनी गटसाखळी फेरीतून सर्वाधिक 20 गुणांची कमाई केली, हे त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे संकेत आहे. कोरोनामुळे आयपीएल स्थगित झाली होती, परंतु दिल्लीच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर तसूभरही फरक पडला नाही. त्याचप्रमाणे, चेन्नई सुपर किंग्ज यंदा जबरदस्त कामगिरी बजावित प्ले-ऑफ फेरीत पुन्हा स्थान मिळविले. गुणतालिकेत चेन्नई व बंगळुरूने प्रत्येकी 18 गुण मिळविले, परंतु सरस धावगतीच्या बळावर चेन्नईने दुसरे स्थान मिळविले.
अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीवर विजय नोंदवूनही त्यांना दुसरे स्थान मिळविता आले नाही व दिल्लीनेही आपले अव्वल स्थान सोडले नाही. तिसर्‍या स्थानावरील बंगळुरू आणि चौथ्या स्थानावरील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी शारजाह येथे एलिमिनेटर सामना होईल. पहहिल्या क्वॉलिफियर सामन्यातील पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळेल. हा पराभूत संघ एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघाविरुद्ध बुधवार 13 ऑक्टोबर रोजी दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यात खेळेल. पहिल्या व दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यातील विजयी संघ 15 ऑक्टोबर रोजी विजेतेपदासाठी अंतिम सामना खेळेल. चेन्नईने आतापर्यंत आठवेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली व तीन वेळा आयपीएल चषक उंचावले. दिल्लीने गतवर्षी अंतिम फेरी गाठली, परंतु त्यांना उपपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. आता दिल्ली अंतिम फेरी गाठण्यासाठी अनुभवी चेन्नईविरुद्ध आपली शक्तीपणाला लावतील.
- प्रतिस्पर्धी संघ असे-
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहिर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिदी, मिशेल सॅण्टनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड , शार्दूल ठाकूर, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भागथ वर्मा, सी. हरी निशांत.
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेटमायेर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, अ‍ॅनरिट नॉर्टिज, आवेश खान, बेन द्वारशुईस, ईशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरीवाला, प्रवीण दुबे, टॉम करन, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्स व विष्णू विनोद.
 
आयपीएल अंतिम गुणतालिका
क्रमांक संघ सामने विजय पराभव गुण धावगती
 
1. दिल्ली 14 10 4 20 0.481
2. चेन्नई 14 9 5 18 0.455
3. बंगळुरू 14 9 5 18 -0.140
4. कोलकाता 14 7 7 14 0.587
5. मुंबई 14 7 7 14 0.116
6. पंजाब 14 6 8 12 -0.001
7. राजस्थान 14 5 9 10 -0.993
8. हैदराबाद 14 3 11 6 -0.545