धक्कादायक ! ... पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा नागरिकांनी गुंतवलेल्या 96 कोटींवर डल्ला; कॅगच्या अहवालात माहिती उघड

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |
मुंबई : देशाच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत सेवा देण्यासाठी ओळखल जाणाऱ्या भारतीय टपाल खात्यात त्याशिवाय देशातल्या मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातल्या गरीब वर्गातल्या मोठ्या लोकसंख्येसाठी (Post Office) पोस्ट हे बचत आणि गुंतवणुकीचं विश्वासार्ह माध्यम आहे.
 

dak 
 
 
 
कारण पोस्टात बचत खातं (Postal Savings Account) तर उघडता येतंच; पण आरडी, एफडी, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना अशा अनेक प्रकारच्या योजनांमधून सुरक्षितपणे पैशांची बचत करता येते. आता या साऱ्या सुविधा ऑनलाइनदेखील उपलब्ध आहेत. अशा या सर्वसामान्य नागरिकांच्या भरवशाच्या पोस्ट ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 19 वर्षांत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तब्बल 96 कोटी रुपयांचे घोटाळे केल्याचं उघड झालं आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच CAG च्या अहवालात ही बाब उघड झाली आहे.
नोव्हेंबर 2002 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत हे घोटाळे झाले आहेत. कॅगचा हा अहवाल 8 ऑगस्टला संसदेत सादर करण्यात आला. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कॅगच्या (CAG Report) अहवालात दिलेल्या माहितीनुसार नेमकं सांगायचं झालं, तर 95.62 कोटी रुपयांची अफरातफर किंवा घोटाळे झाले होते. त्यापैकी आतापर्यंत 14.39 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यात 40.85 लाख रुपयांचा दंड आणि व्याजाचा समावेश आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की अद्याप 81.64 कोटी रुपयांची वसुली व्हायची बाकी आहे. अनेक ठिकाणी असं झालं, की टपाल खात्याचे निरीक्षण अधिकारी पाच वर्षांहून अधिक काळ तपास करूनही अफरातफरीचा माग घेण्यात अयशस्वी ठरले.
ज्या प्रकरणांमध्ये ग्राहकांनी तक्रार केली होती, त्याच आधारे तपास करण्यात आला. तपासाची व्याप्ती त्या पलीकडे गेली नाही. महाराष्ट्रसह तेलंगण, दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश या सर्कल्समधल्या घोटाळ्यांबद्दल अद्याप उत्तर आलेलं नसल्याचं 'कॅग'चं म्हणणं आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता घरबसल्या अ‍ॅपद्वारे तपासा, तुमच्या मोबाईलमध्ये आहे का 'हे' अ‍ॅप? 'कॅग'च्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी पोस्टाच्या 8 सर्कल्समध्ये 9.16 कोटी रुपये जमा केले; मात्र हे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यातच आले नाहीत. ते पैसे पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनीच काढून घेतले.
खोट्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठ्याचे ठसे वापरून चार सर्कल्समध्ये ग्राहकांच्या बचत खात्यांतून 4.08 कोटी रुपये काढण्यात आले. तसंच, अन्य टपाल कर्मचारी किंवा बाहेरच्या व्यक्तींकडून ऑथोरायझेशनशिवाय युझर आयडी आणि पासवर्ड वापरून चार सर्कल्समधल्या पोस्ट ऑफिसेसमधून तीन कोटी रुपये काढण्यात आले.
तपासात असं आढळून आलं, की पाच सर्कल्समधल्या पोस्ट कर्मचाऱ्यांनी (Post Office Fraud) फसवणूक करून 62.05 कोटी रुपये काढले. हे पैसे बंद झालेली खाती पुन्हा सुरू करून त्यातून काढण्यात आले.
त्यानंतर ती खाती पुन्हा बंद करण्यात आली. डेटाबेसमध्ये छेडछाड करून काही खोटी खाती उघडण्यात आली, जी प्रत्यक्षात उघडलीच गेली नव्हती. या खोट्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आल्याचं दाखवून त्यातून चार सर्कल्समधून तब्बल 15.98 कोटी रुपयांची रक्कम अशा खोट्या खात्यांतून काढण्यात आली. दोन सर्कल्समध्ये पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या व्यक्तींच्या मदतीने खोटं खातं उघडून 1.35 कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचं दाखवलं होतं. ती रक्कम नंतर काढून घेण्यात आली होती.